Rain Update Maharashtra In Marathi
Rain Update Maharashtra: उभ्या राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने हाहाकार माजवला आहे. लाखों एकर शेतीच नुकसान यामुळे झाले आहे. आणि आता आज पुनः कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये विजा आणि जोरदार वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यांचा अपवाद वगळता नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तसेच मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. तर चला सविस्तर पाहूया. Rain Update Maharashtra
लेटेस्ट अपडेट साठी आपल्या बीड न्यूज ग्रुप ला लगेच जॉइन व्हा!
| बीड न्यूज ग्रुप जॉइन करा | Join Now |
महाराष्ट्र पाऊस अपडेट

बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. आजपासून पुढील चार दिवस राज्यात मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
Maharashtra Weather Update : राज्यभरात शेतकऱ्यांना रडवत असलेल्या पावसाने विदर्भातही धुमशान घातले आहे. उत्तरेकडून परतीच्या प्रवासाला लागलेला मान्सून विदर्भात पुन्हा सक्रिय झाला आहे. बुधवारपासून सर्व जिल्हे पावसाच्या सावटाखाली आले आहेत.
Maharashtra Weather Update in Marathi
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरच्या अखेरीस राज्यात पुन्हा एकदा पावसाची सक्रियता वाढली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील बहुतांश भागांमध्ये २६ ते २८ सप्टेंबर या कालावधीत हलका ते मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
अशा परिस्थितीमध्ये आणखी पावसाच्या इशारणे शेतकरी आणखी चिंतेत आहे. कारण विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे कापूस व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. Rain Update Maharashtra
महाराष्ट्र हवामानाचा अंदाज काय?
येणाऱ्या काही दिवसात आपल्याला पुढील प्रमाणे हवामान पाहायला मिळणार आहे.
- 2६ सप्टेंबर (शुक्रवार) : दक्षिण विदर्भ आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस होणार.
- २७ सप्टेंबर (शनिवार) : दक्षिण मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज.
- २८ सप्टेंबर (रविवार) : कोकण, मध्य महाराष्ट्र, मुंबई महानगरासह विविध भागांत मुसळधार पाऊस. उर्वरित भागांत हलका ते मध्यम पाऊस.
विदर्भ हवामान अपडेट
विदर्भात पुन्हा जलधारा: गेल्या दोन दिवसांत विदर्भात पावसाने जोर धरला आहे. गडचिरोलीत गुरुवारी सकाळपर्यंत ६७.८ मि.मी. तर सायंकाळपर्यंत २६ मि.मी. पावसाची नोंद झाली. चंद्रपूरमध्ये सकाळी ३२ व सायंकाळी ३४ मि.मी., गोंदियात ३५ मि.मी. तर भंडारा शहरात २२ मि.मी. पावसाची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात रिमझिमसरींसह आकाशात ढगाळ वातावरण दिसत आहे. Rain Update Maharashtra
शेतकऱ्यांमध्ये चिंतचे वातावरण
गेल्या काही दिवासापासूनच्या सततच्या पावसामुळे खरिपातील कापूस, सोयाबीन व तुरीच्या पिकांना मोठा फटका बसत आहे. कारण कापसला बोंड फुटण्यापूर्वीच पावसामुळे शेंड्यावरील कापूस खराब होण्याचा धोका. आहे आणि सोयाबीन च्या शेंगा फुटून दाणे गळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
तसेच तुरीच्या वाढीच्या अवस्थेत पाणी साचल्याने पिकावर नकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी काढणी केलेले पिक तातडीने सुरक्षित जागी साठवून ठेवावे, अशी सूचना कृषी विभागाने केली आहे.
प्रशासनाचा लोकांना इशारा
पावसाच्या या सांभावणेमुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना नदी-नाले व धरणाजवळ सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. धरणांचा साठा वाढल्याने अचानक विसर्ग सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लोकांनी सतर्क राहायचा इशारा दिला आहे. Rain Update Maharashtra
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मान्सून राज्यातून लवकरात लवकर ५ ऑक्टोबरनंतरच माघार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी काही दिवस पावसाचे सावट कायम राहणार आहे.
ही बातमी पहा :








Hi, this is a comment.
To get started with moderating, editing, and deleting comments, please visit the Comments screen in the dashboard.
Commenter avatars come from Gravatar.