Beed Paus Batmya
Beed Paus Batmya (बीड): शुक्रवारी रात्रभर केज तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील 6 राज्य व जिल्हा मार्गांवरील पुलावरून नदीच्या पुराचे पाणी गेल्यामुळे तब्बल 44 गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे 50 हून अधिक शिक्षकांना आपल्या शाळेवर जाता आले नाहीं.
लेटेस्ट अपडेट साठी ग्रुप लगेच जॉइन करा.
बीड हवामान
आजचे हवामान :
- हवामान➜ मध्यम पाऊस
- किमान तापमान➜ २२.०५ °से
- कमाल तापमान➜ २५.५५ °से
- आर्द्रता➜ ८५%
- पाऊस➜ २१.४१ मिमी
- पावसाची शक्यता➜ १००%
- ढगांची व्याप्ती➜ १००%
उद्याचे हवामान :
- हवामान➜ मुसळधार पाऊस
- किमान तापमान➜ २१.५४ °से
- कमाल तापमान➜ २२.९१ °से
- आर्द्रता➜ ९३%
- पाऊस➜ ३०.५३ मिमी
- पावसाची शक्यता➜ १००%
- ढगांची व्याप्ती➜ १००%
सोमवार 29 सप्टेंबर :
- हवामान➜ हलका पाऊस
- किमान तापमान➜ २१.७४ °से
- कमाल तापमान➜ २७.६८ °से
- आर्द्रता➜ ७६%
- पाऊस➜ १.३४ मिमी
- पावसाची शक्यता➜ १००%
- ढगांची व्याप्ती➜ ९९%
मंगळवार 30 सप्टेंबर :
- हवामान➜ विखुरलेले ढग
- किमान तापमान➜ २१.७३ °से
- कमाल तापमान➜ २८.१४ °से
- आर्द्रता➜ ६४%
- पाऊस➜ ० मिमी
- पावसाची शक्यता➜ ०%
- ढगांची व्याप्ती➜ ४९%
बुधवार 01 ऑक्टोबर :
- हवामान➜ हलका पाऊस
- किमान तापमान➜ २१.२९ °से
- कमाल तापमान➜ २७.८२ °से
- आर्द्रता➜ ६५%
- पाऊस➜ ०.७८ मिमी
- पावसाची शक्यता➜ १००%
- ढगांची व्याप्ती➜ ७९%
गुरुवार 02 ऑक्टोबर :
- हवामान➜ मध्यम पाऊस
- किमान तापमान➜ २१.५८ °से
- कमाल तापमान➜ २८.१३ °से
- आर्द्रता➜ ६४%
- पाऊस➜ ११.७६ मिमी
- पावसाची शक्यता➜ १००%
- ढगांची व्याप्ती➜ ८९%
शुक्रवार 03 ऑक्टोबर :
- हवामान➜ मुसळधार पाऊस
- किमान तापमान➜ २१.३४ °से
- कमाल तापमान➜ २२.६ °से
- आर्द्रता➜ ९७%
- पाऊस➜ ३८.०१ मिमी
- पावसाची शक्यता➜ १००%
- ढगांची व्याप्ती➜ १००%
Beed Rain News Today
पावसामुळे संपर्क तुटलेल्या गावात भोपला, वरपगांव, बोरगाव, खोंदला, कापरेवाडी, काळेगाव घाट, नाव्होली,हनुमंत पिंप्री, नाव्होली, दैठणा, शिरूरघाट, नांदूरघाट, बेलगाव, खटकळी, केवड, शिरपूरा, डोणगाव, जाधवजवळा, अवसगाव, वाकडी, कानडीमाळी, तरनळी, साबला, धर्माळा, सानपवस्ती, कळूचीवाडी, कोल्हेवाडी, लव्हूरी, जीवाचीवाडी, येवता, विडा, देवगाव, दहिफळ वडमाऊली, आंधळेवाडी, कोरडेवाडी, शिंदी, गप्पेवाडी, घाटेवाडी, साखरे वस्ती, तांडा, तुकुचिवाडी, बेंगळवाडी, व कल्याणवाडी यांच्यासह 44 गावांचा समावेश आहे. Beed Paus Batmya
ही बातमी पहा : Beed News: मोठी बातमी! बीडच्या स्थानिक पत्रकाराच्या मुलाची निर्घृणपणे हत्या; जागीच मृत्यू, वाचा सविस्तर
3 मंडळात झाली अतिवृष्टी

3 मंडळात झाली अतिवृष्टी: केज तालुक्यातील केज 74.3 मिमी,हनुमंत पिंप्री 77.3 मिमी व होळ 77.5 मिमी अशी अतिवृष्टीची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लोकांचे हाल होत आहेत.
ऐनवेळी बसचे मार्ग बदलले: चौसाळा केज मार्गांवरील जो पूल आहे त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्यामुळे कुर्ला मुंबई -किल्ले धारूर ही बस मांजरसुबामार्गे धारूरला आली. कानडी माळी येथील केजडी नदीला आलेल्या पुरामुळे या मार्गांवरून जाणाऱ्या जीवाचीवाडी, आंधळेवाडी, दहिफळ वडमाऊली, धारूर, विडा मार्गे बीड या बसचे मार्ग बदलून त्यांना पुढे पाठविण्यात आल्याची माहिती आगार प्रमुख नवनाथ चौरे यांनी दिली आहे. Beed Paus Batmya
143 घरांची पड, झड प्रत्येकी 5 हजार मिळणार
जोरदार पावसामुळे केज तालुक्यात आतापर्यंत एकूण 143 घरांची पडझड झाली आहे. नुकसान झालेल्या नागरिकाला घर दुरुस्तीसाठी शासनाच्यावतीने प्रत्येकी 5 हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्यासाठीचा निधी आ. नमिता मुंदडा यांच्या आदेशावरून तात्काळ मंजूर करून धनादेश वाटपापासाठी तयार करण्यात येत असल्याची माहिती नायब तहसीलदार आशा वाघ गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. Beed Paus Batmya
ही बातमी वाचा :
धन्यवाद!







