Snake Bite News

Snake Bite News जालना : साप पकडणे ही एक कला आहे, काही वर्षांपूर्वी फक्त गारुडी लोक साप Snake) पकडाचे, गावखेड्यात निघालेल्या सापांना रानावनातच वाट करुन दिली जायची, तर कुठे जीवही मारलं जायचं. पण आता मात्र सर्पमित्र सापाला पकडून वनामद्धे सोडून देतात. पण आज एका तरुणाचा सापाला पकडताना दंश होऊन मृत्यू झाला आहे. तर नेमके प्रकरण काय आहे, पुढे वाचा सविस्तर.
जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट हव्या असतील तर आपला व्हातसप्प ग्रुप लगेच जॉइन करा.
Jalana Latest News Today Marathi
आता आपल्याला गारुडी जास्त पाहायला मिळत नाहीत. अलिकडच्या काळात सर्पमित्र नव्याने पुढे येऊन साप पकडण्याचं प्रशिक्षण घेतात. त्यामुळे, वन्यजीव मित्र म्हणून ते जनजागृती देखील करतातय. त्यामुळे, आता सर्प मित्रांकडून विषारी सापही पकडले जात असून ते रानावनात सोडले जात आहेत. मात्र, दुर्दैवाने जालन्यातील (Jalna) निरखेडा गावात एका युवकाचा विषारी घोषण साप पकडताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेचा विडियो देखील मोबाइल मध्ये कैद झाला आहे.
ही बातमी वाचा : October Weather Update in Marathi: सप्टेंबर अतिवृष्टीत गेला, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा पाऊस झोडपणार, या ठिकाणी अलर्ट
या घटनेनं सर्वत्र हळहळ होत आहे. आणि जालना मध्ये अशी घटना घडलेली असतानाच डोंबिवलीतही (Dombivali) सापाने चावा घेतल्याने तीन वर्षांच्या चिमुकलीसह तिची मावशीही दगावली आहे. जालन्यातील नरखेडा गावात साप पकडण्याचे धाडस करणाऱ्या एका तरुणाला जीव गमवावा लागला. गावात मोकळ्या जागी दिसलेला साप पकडण्याचं धाडस करताना एका 30 वर्षीय तरुणाला सापाने चावा घेतला.
त्यामध्ये या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. गोविंद हिवाळे अस तरुणाचं नाव आहे. आणि त्याला गावाशेजारी नदीकाठी त्यास साप दिसला होता. सापांबद्दल, विषारी सापांबद्दल ज्ञान नसतानाही या तरुणाने हा साप पकडण्याचं धाडस केलं. मात्र, ह्या विषारी सापाने क्षणार्धात त्याच्या हाताला चावा घेतला. त्यावेळी, तरुणाने हात पाठीमागे घेताच, त्याच्या हातातून रक्तही येत असल्याचं पाहायला मिळालं. Snake Bite News
मात्र, तो बराच वेळ तिथच होता. अखेर, त्याला होत असलेल्या त्रासाची जाणीव होताच, तातडीने उपचारासाठी या तरुणाला रुग्णालयात हालवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्या घटनेचा विडियो देखील तुम्ही पुढे पाहू शकता.
ही बातमी वाचा : Dasara Melava Sawargaon 2025: राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जन्मभूमीत होणार पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा, लाखोंच्या गर्दीची शक्यता, पहा इतिहास
Ddombivali Snake Bite News
डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरातही अशीच एक हृदयद्रावक घटना घडली. साखरझोपेत असतानाच सर्पदंश झाल्याने प्राणवी भोईर (वय 3) या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. तर, तिच्यासोबत झोपलेल्या मावशीलाही साप चावल्याचे निदर्शनास आले होते. आता, 24 वर्षीय मावशी प्राणवी हिचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
विशेष म्हणजे डॉक्टरांनी सुरुवातीला दोघींची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले होते. मात्र, काही वेळात प्राणवीची प्रकृती बिघडली, आणि तिला ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, तेथेच तिचा मृत्यू झाला. Snake Bite News
ही बातमी वाचा :







