Manoj Jarange Patil News: ‘लय बेकार होईल, तुझ्यामुळे अजित पवारचा पण कार्यक्रम लावेन’ मनोज जरांगेंचा कोणाला इशारा?

Date:

Manoj Jarange Patil News Today

Manoj Jarange Patil News Today: “शहाणा असशील तर हातातून वेळ गेलेली नाही. तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही. छगन भुजबळच ऐकून माझ्या जातीच्या नादी लागू नको. तुझ्या राजकीय करिअरचा देव्हारा करुन टाकेन. राजकारणातून तुमचं नामोनिशाण जाईल” असे कोणाला म्हणाले वाचा पुढे.

आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प चॅनल लगेच जॉइन करा.

लेटेस्ट अपडेट साठी बीड न्यूज WhatsApp चॅनल जॉइन कराJoin Now

मनोज जरांगे बातम्या

Manoj Jarange Patil News Today

काल पर पडलेल्या दसरा मेळाव्यातील केलेल्या भाषणानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांना इशारा दिला. धनंजय मुंडेंना थेट राजकारण संपवण्याची धमकी दिली. धनंजय मुंडे म्हणाले की, मराठा समजाला आरक्षण दिलं, याचा आनंद आहे. पण ओबीसीमधून देऊ नका त्यांना ओबीसीतून का हवं? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. त्यावर मनोज जरांगेंनी प्रतिप्रश्न केला. Manoj Jarange Patil News Today

ही बातमी वाचा : October Weather Update in Marathi: सप्टेंबर अतिवृष्टीत गेला, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा पाऊस झोडपणार, या ठिकाणी अलर्ट

“तुम्ही का घेतलं बंजारा समाजातून? नाही घ्यायच, कशाला घेतलं?. कशाला लोकांच्या काड्या करतो. मला काय बोलतो हेकन्या, आम्ही ओबीसीच खातो, मग तू बंजारा समाजाच का खातो? तू दिसतो का त्यांच्यासारखा?” अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली.

“तू माझ्या नादी लागू नको. त्याला एकदाच सांगतो, माझ्या नादी लागू नका. शहाणपणा करायचा नाही. दादा फादा मी मोजती नसतो. रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्यावर आणि माझ्या जातीवर बोलायच नाही. माझ्या नादालालागला तर दोघांचा बाजार उठवेन. छक्के-पंजे माझ्यासोबत खेळू नको. तुझ्यामुळे अजित पवारचा पण कार्यक्रम लावीन. मी जातीला कट्टर मानणारा आहे. ऐकून घेतोय म्हणून शहाणपणा करायचा नाही. तो ज्याच्या प्रचाराला जाणार, त्या सीट पाडणार“ असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. Manoj Jarange Patil News Today

‘असे प्रश्न मला नका विचारु, मी त्यांना मोजीत नाही’

पंकजा मुंडे म्हणाल्या, आमच्या ताटातलं घेऊ नका, त्यावर उत्तर देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “तुम्ही लोकांच्या ताटातलं ओरबाडून खाता. तुम्ही ज्ञान शिकवता, तुम्ही बिचाऱ्या त्या बंजारा समाजाच्या पाच टक्के जागा खाल्ल्या. लोकांच वाटोळं केलं, काय ज्ञान शिकवता?” लक्ष्मण हाकेंवर प्रश्न विचारताच, ‘असे प्रश्न मला नका विचारु, मी त्यांना मोजीत नाही‘ असं उत्तर मनोज जरांगेंनी दिलं.

‘तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही‘

धनजय मुंडेंनी कट ऑफ लिस्ट सांगितली. त्यावर सुद्धा मनोज जरांगे आक्रमकपणे बोलले. “तू किती हुशार आहे माहित आहे, तुला पुन्हा एकदा सांगतो माझ्या नादी लागू नको. शहाणा असशील तर हातातून वेळ गेलेली नाही. तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही. छगन भुजबळच ऐकून माझ्या जातीच्या नादी लागू नको. तुझ्या राजकीय करिअरचा देव्हारा करुन टाकेन.

राजकारणातून तुमचं नामोनिशाण जाईल. लय बेकार होईल, मराठा संपवून टाकतील, त्यांनाही पाडतील. मराठे हुशार झालेत. आता मराठ्यांनी कडवट रहायचं“ असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. Manoj Jarange Patil News Today

ही बातमी वाचा :


Bhagvat

मी भागवत! मला मीडिया व डिजीटल कंटेंट लेखनाचा 3 वर्षांचा अनुभव आहे. यांना लाईफस्टाईल, सौंदर्य, आरोग्यविषयक घरगुती उपाय यामध्ये विशेष रस आहे. मला, वाचकांच्या गरजा आणि आवड लक्षात घेऊन त्या सोप्या समजेल अशा मराठी भाषेत आणि संशोधन करून सोबतच जीवनशैलीत वापर करून लेख लिहिण्याची आवड आहे.