Mahadev Mundh Case Beed: महादेव मुंडे खून प्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडेंचा मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी; दोन वर्षांनंतरही न्याय नाही!

Date:

Mahadev Mundh Case Beed in Marathi

बीड बातम्या : येथील प्रिया नगर परिसरातील बँकेचे पिग्मी एजंट महादेव दत्तात्रय मुंडे यांच्या खुनाला (Mahadev Mundh Case Beed) दोन वर्षे पूर्ण होत आली तरीही आरोपी अद्याप निष्पन्न झालेले नाहीत. या प्रकरणातील तपास ठप्प झाल्याने मुख्यमंत्र्यांनी स्वतः हस्तक्षेप करून तपासाला गती द्यावी, अशी मागणी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे. 

तर प्रकरण नेमके काय आहे? वाचा पुढे सविस्तर आणि जिल्ह्यातील व राज्यातील अशाच लेटेस्ट अपडेट साथी आपला व्हाटसप्प चॅनल लगेच जॉइन करा.

लेटेस्ट अपडेट साठी बीड न्यूज WhatsApp चॅनल जॉइन कराJoin Now

महादेव मुंढे बातम्या बीड

Mahadev Mundh Case Beed

21 ऑक्टोबर 2023 रोजी परळी येथील तहसील कार्यालयाजवळील पटांगणात महादेव मुंडे यांची तीक्ष्ण हत्याराने निर्घृण हत्या करण्यात आली होती. घटनेला दोन वर्षांचा कालावधी होत आला आहे. या मध्ये पोलिसांनी कोणत्याही आरोपीला अटक केलेली नाही. या निष्क्रियतेबद्दल ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून तपासाला गती द्यावी, अशी मागणी केली होती, असे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत व्हावा म्हणून मुंडे यांच्या कुटुंबीयांनी 30 जुलै 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. Mahadev Mundh Case Beed

त्यानंतर पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला. मात्र,त्यांच्या तपासास दोन महिने उलटूनही आरोपी निष्पन्न झाले नाहीत व त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. पंकज कुमावत यांच्यावर आपला विश्वास आहे असे ही त्यांनी सांगितले.

ही बातमी वाचा : Manoj Jarange Patil News: ‘लय बेकार होईल, तुझ्यामुळे अजित पवारचा पण कार्यक्रम लावेन’ मनोज जरांगेंचा कोणाला इशारा?

Beed News Today in Marathi

तपासात लक्षणीय प्रगती नाही : या दरम्यान, 25 जुलै 2025 रोजी कनेरवाडी येथे ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या माहेर आणि सासरच्या नातेवाइकांनी एसआयटी स्थापन व तपासाच्या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन केले होते. तसेच जुलै महिन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी परळीत येऊन मुंडे कुटुंब याची भेट घेतली होती . महादेव मुंडे खून प्रकरणात नेमकं दडलय काय हे मुख्यमंत्र्यांनी जगासमोर आणावे.

असे आवाहनही त्यांनी केले आहे. अद्याप तपासात कोणतीही लक्षणीय प्रगती झालेली नाही. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचाही माझ्याशी संपर्क असतो असे त्या म्हणाले. तर नेमक या प्रकरणाचा आता शेवट कशा पद्धतीने होईल याकडे लक्ष लागून आहे. Mahadev Mundh Case Beed

ही बातमी वाचा :

Bhagvat

मी भागवत! मला मीडिया व डिजीटल कंटेंट लेखनाचा 3 वर्षांचा अनुभव आहे. यांना लाईफस्टाईल, सौंदर्य, आरोग्यविषयक घरगुती उपाय यामध्ये विशेष रस आहे. मला, वाचकांच्या गरजा आणि आवड लक्षात घेऊन त्या सोप्या समजेल अशा मराठी भाषेत आणि संशोधन करून सोबतच जीवनशैलीत वापर करून लेख लिहिण्याची आवड आहे.