Beed News Today Marathi: आई-वडील शेतात, घरी घडली दुर्घटना; चिमुकलीचा उकिरड्याच्या खड्ड्यात बुडून मृत्यू!

Date:

Beed News Today Marathi

केज (बीड) Beed News Today Marathiबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील बजगुडे वस्तीवर रविवारी सायंकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. घराशेजारी उकिरड्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्यात साचलेल्या पाण्यात बुडून आर्या अमोल बजगुडे (वय ७) या पहिलीत शिकणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेमुळे परिसरात आणि बजगुडे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तर नेमके काय घडले होते वाचा पुढे सविस्तर आणि लेटेस्ट अपडेट साथी जॉइन करा आपला बीड न्यूज व्हाटसप्प चॅनल लगेच.

लेटेस्ट अपडेट साठी बीड न्यूज WhatsApp चॅनल जॉइन कराJoin Now

नेमके काय घडले?

आर्याचे आई-वडील, अमोल बजगुडे आणि त्यांची पत्नी, हे दोघेही रविवारी शाळेला सुट्टी असल्याने आर्याला घरी ठेवून घराशेजारील शेतात कामासाठी गेले होते. आणि सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आर्या खेळता खेळता घराजवळील उकिरड्यासाठी खोदलेल्या खड्ड्याजवळ गेली. जो पाण्याने फूल भरलेला होता. Beed News Today Marathi

ही बातमी वाचा : Chhagan Bhujbal on Manoj Jarange: जरांगे मराठ्यांचा लीडर नाहीच, तो वाळू चोर… आपण उगाच जरांगेला डोक्यावर घेतो; भुजबळांनी जरांगेंना..

या खड्यात पावसाचे पाणी साचले होते. अचानक, आर्याचा तोल गेला आणि ती साचलेल्या पाण्यात पडली. बराच वेळ होऊनही आर्या न दिसल्याने आईने घरी धाव घेतली. तेव्हा आर्या खड्यातील पाण्यात पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. Beed News Today Marathi

उपचारापूर्वीच मृत्यू

Beed News Today Marathi

आर्याच्या आईने तात्काळ तिला पाण्यातून बाहेर काढले. नाका-तोंडात पाणी गेल्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक होती. घाबरलेल्या आई-वडिलांनी क्षणाचाही विलंब न करता तिला केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच नाका-तोंडात पाणी जाऊन आर्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

ही बातमी वाचा : Mahadev Mundhe Case Beed: महादेव मुंडे खून प्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडेंचा मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी; दोन वर्षांनंतरही न्याय नाही!

पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या या चिमुकलीच्या अशा अचानक जाण्याने बजगुडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच, बजगुडे वस्तीवर आणि चिंचोलीमाळी गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. Beed News Today Marathi

ही बातमी वाचा :

Bhagvat

मी भागवत! मला मीडिया व डिजीटल कंटेंट लेखनाचा 3 वर्षांचा अनुभव आहे. यांना लाईफस्टाईल, सौंदर्य, आरोग्यविषयक घरगुती उपाय यामध्ये विशेष रस आहे. मला, वाचकांच्या गरजा आणि आवड लक्षात घेऊन त्या सोप्या समजेल अशा मराठी भाषेत आणि संशोधन करून सोबतच जीवनशैलीत वापर करून लेख लिहिण्याची आवड आहे.