Sangram Jagtap News Today
अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) जिल्ह्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी घेतलेली ‘हिंदुत्वा’ची भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. विशेषतः, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारख्या भाजप नेत्यांसाठी ही भूमिका राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाचा सर्व बातमी पुढे विस्तृतपणे आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प चॅनल लगेच जॉइन करा. जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला थेट व्हाटसप्प वर मिळतील.
संग्राम जगताप

आता गेले काही दिवसात आपण सोशल मीडिया वर तर पाहताच आहोत की अहिल्यानगर मध्ये झालेल्या सभेमुळे जलील आणि आमदार संग्राम जगताप ही एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. आणि आता संग्राम जगताप यांनी अलीकडेच जाहीरपणे ‘हिंदुत्वा’च्या मुद्द्याला समर्थन दिले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे महायुतीमधील त्यांच्या पक्षाच्या (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. Sangram Jagtap
ही बातमी वाचा : Chandrashekhar Bawankule: “उद्धव ठाकरे हे माझ्या राजकीय कारकिर्दीतील पाहिलेले पहिले हताश मुख्यमंत्री” – बावनकुळे यांची टीका
विखे पाटलांना बळ मिळणार का?
जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हे सातत्याने हिंदुत्वाच्या आणि भाजपच्या विचारधारेचे समर्थन करत आले आहेत. अशा वेळी, जगताप यांनीही हिंदुत्वाची बाजू घेतल्यामुळे, विखे पाटलांच्या नेतृत्वाखालील ‘महायुती’च्या विचारधारेला जिल्ह्यात अधिक बळ आणि एकप्रकारे दुजोरा मिळत आहे.
राजकीय परिणाम
जगताप हे महायुतीचे आमदार असले तरी, त्यांची ही भूमिका विरोधी पक्षांना टीका करण्याची संधी देत आहे. मात्र, त्याच वेळी, भाजप आणि विखे पाटील यांना जिल्ह्यात हिंदुत्वाचे वातावरण अधिक मजबूत करण्यासाठी याचा अप्रत्यक्ष फायदा होऊ शकतो. जगताप यांच्या भूमिकेमुळे विखे पाटील यांच्या ‘हिंदुत्ववादी’ नेतृत्वाला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन मिळत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. Sangram Jagtap
यामुळे, आगामी काळात अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात ‘हिंदुत्व’ आणि महायुतीच्या नेतृत्वावर याचे काय परिणाम होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण नुकत्याच पार पडलेला विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये सहभागी झालेल्या संग्राम जगताप यांना विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने कमी मतदान केले. एकेकाळी मुस्लिम समाज त्यांना भरभरुन मतदान करायचा.
ही बातमी वाचा : Uddhav Thackaray: ‘दोन उपमुख्यमंत्र्यांच्या पदावरून उद्धव ठाकरेंनी सरकारला सुनावले खडेबोल’ हा आहे.
मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदार त्यांच्यापासून दुरवाला, मुस्लिम बहुल भागात विकासकामे करून ही मतदान मिळाले नसल्याने ती सल संग्राम जगताप यांच्या मनात कायम असल्याची मतदारसंघात चर्चा आहे. त्यामुळेच, हिंदुत्ववादी मतांना आकर्षित करण्याची रणनीती संग्राम जगताप यांनी आखली आहे. गेल्या तीन टर्म आमदार असणाऱ्या संग्राम जगताप प्रखर हिंदुत्ववादी विचाराकडे झुकले असले तरीही ते सध्या भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता कमी आहे. Sangram Jagtap
तर, अजित पवारांनाही ते परवडणारे नाही. कारण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेल्या संग्राम जगताप यांना भाजपसोबत जायचे असेल तर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूकाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे सध्या आहे त्याच परिस्थितीतच अजित पवार आणि संग्राम जगताप या दोघांना काम करावे लागणार आहे. Sangram Jagtap
ही बातमी वाचा :







