Sanjay Raut Raj Thackeray News Today Marathi
Sanjay Raut Raj Thackeray: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि काँग्रेसबद्दल केलेल्या एका विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
संजय राऊत यांच्या “राज ठाकरे यांना काँग्रेस सोबत हवी आहे” या वक्तव्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) नाराजीचे सूर उमटले आहेत. तर सविस्तर बातमी नेमकी काय आहे वाचा पुढे सविस्तर आणि अशाच अपडेट साठी आपला व्हाटसप्प चॅनल लगेच जॉइन करा.
संजय राऊत काय म्हणाले होते?

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते की, “स्वतः राज ठाकरे यांची अशी इच्छा आहे की, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सोबत घेणे गरजेचे आहे. ही त्यांची भूमिका आहे, पण याचा अर्थ तो अंतिम निर्णय नाही.” संजय राऊत पुढे म्हणाले की, काँग्रेस हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा पक्ष आहे आणि शिष्टमंडळात काँग्रेसचा समावेश असणे गरजेचे आहे, ही सर्वांचीच भूमिका असून राज ठाकरे यांचीसुद्धा तीच भूमिका आहे. Sanjay Raut Raj Thackeray
ही बातमी वाचा : Chandrashekhar Bawankule: “उद्धव ठाकरे हे माझ्या राजकीय कारकिर्दीतील पाहिलेले पहिले हताश मुख्यमंत्री” – बावनकुळे यांची टीका
संजय राऊत यांच्या वक्तव्यावर मनसेची नाराजी
राज ठाकरे यांना काँग्रेस हवी आहे, या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर मनसेच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “आमच्या पक्षाची भूमिका आम्ही स्वतः मांडू. काँग्रेसला आम्ही कोणताही प्रस्ताव दिलेला नाही,” असे म्हणत मनसे नेत्यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.
ही बातमी वाचा : Beed News Today: बीडमध्ये धक्कादायक घटना! बायको आणि सासरच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; चिठ्ठी लिहून संपवलं जीवन
संजय राऊत यांचा राज ठाकरेंना खास मेसेज
मनसेकडून नाराजी व्यक्त झाल्यानंतर संजय राऊत यांनी तातडीने राज ठाकरे यांना वैयक्तिक मेसेजद्वारे (Message) स्पष्टीकरण दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. “मी असे काहीही बोललो नाही आणि माझ्या वक्तव्याचा तो अर्थ नाही,” असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना दिल्याचे समजते.
संजय राऊत रुग्णालयात दाखल
दरम्यान, या राजकीय घडामोडींदरम्यान संजय राऊत यांना मुंबईतील भांडुप येथील फोर्टिज हॉस्पिटलमध्ये (Fortis Hospital) दाखल करण्यात आले आहे. मागील आठवड्यात त्यांची अँजिओग्राफी झाली होती. त्यानंतरही त्यांनी छत्रपती संभाजीनगरचा दौरा केला होता. यावेळी त्यांना त्रास जाणवू लागला होता.
आज पुन्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. यापूर्वी 2019 मध्ये त्यांची अँजिओप्लास्टी झाली होती. आज दिवसभर त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या केल्या जाणार आहेत. Sanjay Raut Raj Thackeray
ही बातमी वाचा :







