Asia Trophy News In Marathi
Asia Trophy News: काल रात्री झालेल्या एशिया कप फायनल मध्ये भारतीय संघाने (Team India) अंतिम सामन्यात पाकिस्तानवर 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत आशिया चषकावर (Asia Cup 2025 Final 2025 Trophy) नाव कोरलंय. तिलक वर्मा (Tilak Verma) भारताच्या विजयाचा हिरो ठरला. रिंकू सिंहने (Rinku Singh) अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार लगावत भारताचा विजय पक्का केला. आणि 140 करोंड लोकांचे मन जिंकले.
या विजयासह सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत एकही सामना न हारता ही स्पर्धा जिंकली आहे. दरम्यान भारत आणि पाकिस्तान संघांमधल्या आशिया चषकाच्या फायनलइतकाच या स्पर्धेचा तासाभरापेक्षा जास्त वेळ लांबलेला पारितोषिक वितरण सोहळाही तितकाच नाट्यमय ठरला.
Raw emotions 🔥
— BCCI (@BCCI) September 28, 2025
What it means to win for #TeamIndia 🇮🇳
Scoreboard ▶️ https://t.co/0VXKuKPkE2#AsiaCup2025 | #Final pic.twitter.com/3gml0uDqe9
याच कारण असे होते की आशियाई क्रिकेट कौन्सिल म्हणजे एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) यांच्या हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास भारतीय संघानं स्पष्ट नकार दिला. पाकिस्तान च्या या झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानी fans मध्ये खूप रोष पाहायला मिळत आहेत. काही तर त्यांच्याच टीम ला शिवीगाळ करताना पाहायला मिळाले. Asia Trophy News
Ind vs Pak Asia Cup 2025 Final Trophy

एसीसीनं आपल्याला ही माहिती दिल्याचं सांगून समालोचक सायमन डूल यांनी पारितोषिक वितरण सोहळा थोडक्यात गुंडाळला. आशिया चषकाचा अंतिम सामना जिंकल्यानंतरही भारतीय संघाला विजयी ट्रॉफी मिळाली नाही. ट्रॉफी न घेता भारतीय खेळाडूंनी अखेर सेलिब्रेशन केले. भारतीय संघाचे कुलदीप यादव, अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा या भारतीय खेळाडूंनी आपली वैयक्तिक पारितोषिकं अन्य मान्यवरांच्या हस्ते स्वीकारली.
पण पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगानं उपविजेतेपदाचा धनादेश एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते स्वीकारला. मात्र भारतीय खेळाडूंनी मोहसिन नकवींच्या हस्ते विजेतेपद स्वीकारण्यास नकार दिला. तसेच शेवटपर्यंत त्या भूमिकेवर कायम राहिले. त्यामुळे मोहसिन नक्वी यांचा चेहरा बक्षीस समारंभावेळी पडला होता. यासगळ्या प्रकरणावर आता बीसीसीआयची पहिली प्रतिक्रिया (BCCI React On Team India Trophy Denied) आली आहे. Asia Trophy News
ही बातमी पहा : Beed Batmya Marathi: गोदावरीला पूर, बीड जिल्ह्यात जीवन विस्कळीत, तांदूळ आणि कन्या खाण्याची वेळ, महिला संतप्त
BCCI React On Team India Trophy Denied
भारताचा ट्रॉफी घेण्यास नकार, बीसीसीआयची प्रतिक्रिया: पाकिस्तानचे मंत्री आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वीकडून विजयाची ट्रॉफी घेण्यास भारतीय संघाने स्पष्टपणे नकार दिला. भारताच्या या भूमिकेवर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या देशाविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीकडून ट्रॉफी स्वीकारता येणार नाही.
“पण याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती आपल्या देशाला सादर करण्यात येणारी ट्रॉफी आणि पदके त्यांच्या हॉटेलच्या खोलीत घेऊन जाईल. हे पूर्णपणे अनपेक्षित आहे, असं देवजीत सैकिया (Devajit Saikia) म्हणाले. तसेच आशिया चषकाची ट्रॉफी भारतात येणार की नाही, याबाबत मात्र देवजीत सैकिया यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीय. परंतु बीसीसीआय याबाबत आयसीसीकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे. Asia Trophy News
"Cannot accept trophy from a person who represents a country that is waging war against our country': BCCI secretary
— ANI Digital (@ani_digital) September 28, 2025
Read @ANI Story |https://t.co/z7rH2hrSZT#DevajitSaikia #AsiaCup #MohsinNaqvi #INDvPAK #cricket #TeamIndia pic.twitter.com/INnYjTdq8e
Asia Cup Trophy Controversy
नेमकं काय घडलं?: हे सर्व प्रकरण घडण्यामाघाचे कारण म्हणजे एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी हे पाकिस्तानचे गृहमंत्री आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही आहेत. त्यामुळंच भारतीय संघानं मोहसीन नक्वी यांच्या हाताने आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. भारतीय संघाच्या या जिद्दानंतरही मोहसीन नक्वी देखील ट्रॉफी देण्यासाठी हट्ट करत होते. Asia Trophy News
त्यानंतर ट्रॉफी न घेण्याचा निर्णय भारतीय संघाने घेतला. शेवटपर्यंत भारतीय संघाने ट्रॉफी घेतली नाही. आणि शेवटची ट्रॉफी न घेताच भारतीय संघाने सेलिब्रेशन केले. त्यानंतर मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन निघून गेले. पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी तिन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणं कटाक्षानं टाळलेलं.
India Celebration Without Trophy News

तसंच फायनलच्या नाणेफेकीआधी फोटो शूटला जाणंही टाळलेलं. आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळं आशिया चषकाचा पारितोषिक वितरण सोहळा तासभरापेक्षा उशिरानं सुरु झाला. तेवढा वेळ मोहसीन नक्वी हे एकटेच व्यासपीठावर उपस्थित होते. पाकिस्तान संघही जवळजवळ 55 मिनिटं ड्रेसिंगरूममध्येच बसून होता. Asia Trophy News
तरी देखील भारतीय संघाने मोठ्या जोशमद्धे ट्रॉफी शिवाय Celebration केले. हे पाहून पाकिस्तान टीम आणि Fans च्या जीवाला चांगलाच चटका लागला.
ही बातमी वाचा :







