Beed Batmya Marathi: गोदावरीला पूर, बीड जिल्ह्यात जीवन विस्कळीत, तांदूळ आणि कन्या खाण्याची वेळ, महिला संतप्त 

Date:

Beed Batmya Marathi Today

Beed Batmya Marathi: राज्यामध्ये सध्या विविध भागात मुसळदार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. आणि यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. बीडच्या गोदावरी नदी क्षेत्रात सुरु असलेल्या सततच्या पावसाने तसेच नाथसागरातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळं गोदावरी नदीत पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

आणि या वाढलेल्या पाण्यामुळे जे लोक नदीकाठी राहत आहेत ते मात्र पुरते घाबरून गेले आहेत. कित्येक गावाचे संपर्क देखील तुटले आहेत आणि यामुळे इथले जनजीवन विस्कळीत झाले आहे. Beed Batmya Marathi

लेटेस्ट अपडेट साठी आपला बीड न्यूज व्हाटसप्प चॅनेल लगेच जॉइन करा.

बीड न्यूज WhatsApp चॅनल जॉइन कराJoin Now

Godavari River Flood News

Beed Batmya Marathi Today

गोदावरी नदीकाठच्या गावांना पुराचा धोका : गोदावरी नदीमध्ये पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नदीकाठच्या नागझरी, खामगाव अगरनांदूर यासह इतर गावांना पुराचा धोका आहे. पावसाने विद्युत पुरवठा बंद असल्याने मागील चार दिवसांपासून या गावात दळण वळणाची व्यवस्था नाही. तर पुराच्या पाण्यामुळे रस्ता नसल्याने मोठी कसरत नागरिकांना करावी लागत आहे.

आणि वीज पुरवठा खंडित झाला असल्याने तांदूळ आणि कन्या खाऊन लोकांना भूक भागवावी लागत आहे. गावातील अंगणवाडीत देखील पाणी शिरलं आहे. त्यामुळं साठवून ठेवलेलं धान्य शालेय साहित्य पाण्यात भिजल्याच्या व्यथा संतप्त झालेल्या महिलांनी व्यक्त केल्या आहेत. Beed Batmya Marathi

ही बातमी वाचा : Beed Paus Batmya: केज तालुक्यात पावसाचा हाहाकार; तब्बल ४४ गावांचा संपर्क तुटला, १४१ घरांची पडझड!

27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर हवामान महाराष्ट्र

27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढणार, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाकडून 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात व्यापक पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे शहरी पुराच्या धोक्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सतर्क रहावे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळवण्यात आले आहे.

घाट परिसरात लहान मोठ्या दरडी कोसळण्याची शक्यता

या होणाऱ्या सततच्या पावसामुळे घाट परिसरामध्ये लहान मोठ्या दरडी कोसळण्याचा देखील इशारा आपत्कालीन केंद्राकडून देण्यात आला आहे. तसेच Flash Flood चा धोका निर्माण होवू शकतो. नद्यांच्या प्रवाहावर सतत लक्ष ठेवून आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यांमध्ये नियंत्रण कक्ष 24X7 कार्यरत ठेवावेत.

शहरी सखल भागात पाणी उपसा पंप तैनात करण्यात यावे. त्याचप्रमाणे कमी उंचीच्या भागांचे निरीक्षण ठेवून आवश्यक कार्यवाही करावी. धोकादायक आणि जुन्या इमारतीवर CSSR च्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. वीज व रस्ते पायाभूत सुविधासाठी दुरुस्ती पथक, साखळी आरे व फीडर संरक्षण युनिट तैनात करावे. असे आदेश देण्यात आले आहेत. Beed Batmya Marathi

ही बातमी वाचा :

Bhagvat

मी भागवत! मला मीडिया व डिजीटल कंटेंट लेखनाचा 3 वर्षांचा अनुभव आहे. यांना लाईफस्टाईल, सौंदर्य, आरोग्यविषयक घरगुती उपाय यामध्ये विशेष रस आहे. मला, वाचकांच्या गरजा आणि आवड लक्षात घेऊन त्या सोप्या समजेल अशा मराठी भाषेत आणि संशोधन करून सोबतच जीवनशैलीत वापर करून लेख लिहिण्याची आवड आहे.