Beed News Today: ‘मुलीचे लग्न ठरल्याप्रमाणे होईल’, धनंजय मुंडेंनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यास धीर देत दिला शब्द!

Date:

बीड जिल्हा बातम्या

Beed News Today (बीड) : अतिवृष्टी व पुरामुळे परळी तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठी असलेल्या तेलसमुख, बोरखेड, ममदापूर गावांचे मोठे नुकसान झाले असून, आमदार धनंजय मुंडे यांनी गुरुवारी दुपारी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला.

जिल्ह्यातील व राज्यातील लेटेस्ट अपडेट साठी जॉइन करा बीड न्यूज व्हाटसप्प चॅनल

बीड न्यूज ग्रुप जॉइन कराJoin Now

Beed News Today

तेलसमुख येथील एका शेतकरी महिलेचे कापसाचे पूर्ण पीक नासल्याने तिच्या मुलीच्या लग्नाबाबत ती हतबल झाली होती. त्यांना धीर देत मुंडे म्हणाले, “अक्का, लग्न दिवाळीत ठरल्याप्रमाणेच होईल, सर्व जबाबदारी मी घेतो.” यावेळी त्यांनी प्रशासनाला शेतकऱ्यांना १००% नुकसानभरपाई मिळेल यासाठी काटेकोर पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Farmer Death News: सगंळ पैसं शेतात गेलं अन् पीक पाण्यात; बॅंकांचे कर्ज आणि सावकारांच्या जाचामुळे घेतला टोकाचा निर्णय

ममदापूर येथील ३८ वर्षीय तरुण शिवराज कदम हा पुराच्या पाण्यात दि. १६ सप्टेंबर रोजी रात्री कौडगाव हुडा येथील नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याने मृत झाला होता, त्या तरुणाच्या कुटुंबीयांना यावेळी प्रशासनाच्या वतीने ४ लाख रुपयांची आर्थिक मदत आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. सदर रक्कम मयत शिवराज कदम यांच्या पत्नीच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. 

यावेळी येथे उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, युवक नेते अजय मुंडे, सूर्यभान मुंडे, राजाभाऊ पौळ, प्रभाकर पौळ, संजय जाधव, नितीन निर्मळ, भागवत कदम, बालासाहेब कदम, वसंत राठोड, भगवान पौळ, जानीमिया कुरेशी यांच्या सह महसूल, कृषी, पोलीस आदी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. Beed News Today

ही बातमी वाचा : Rain Update Maharashtra: राज्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार; या विभागात होणार जास्त पावसाचा इशारा!

धन्यवाद!

Bhagvat

मी भागवत! मला मीडिया व डिजीटल कंटेंट लेखनाचा 3 वर्षांचा अनुभव आहे. यांना लाईफस्टाईल, सौंदर्य, आरोग्यविषयक घरगुती उपाय यामध्ये विशेष रस आहे. मला, वाचकांच्या गरजा आणि आवड लक्षात घेऊन त्या सोप्या समजेल अशा मराठी भाषेत आणि संशोधन करून सोबतच जीवनशैलीत वापर करून लेख लिहिण्याची आवड आहे.