Beed News Today Marathi
Beed News Today Marathi: येथील जिल्हा कारागृहात तीन कैद्यांवर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणण्यात आला. त्यांना पैसे, गाडी आणि बंगल्याचे आमिष दाखविण्यात आले. यासंदर्भात या तीनही कैद्यांनी आपल्यामार्फत गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव, अपर पोलिस महासंचालकांसह सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ई-मेलद्वारे तक्रार केल्याची माहिती कैद्यांचे वकील ॲड. राहुल आघाव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
तर नेमके प्रकरण काय आहे वाचा पुढे सविस्तर आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला बीड न्यूज व्हाटसप्प चॅनल लगेच जॉइन करा. Beed News Today Marathi
बीड कारागृह धर्मांतर न्यूज

बीड येथील जिल्हा कारागृहात तीन कैद्यांवर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणण्यात आला. विशेष म्हणजे कारागृहातील महिला कर्मचाऱ्यांचाही छळ केल्याचा दावा त्यांनी केला. सोमवारीच भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनीही असेच आरोप केले होते.
ही बातमी वाचा : Samarth Cooperative Bank News: राज्यातील समर्थ सहकारी बँकेला RBI चा दणका, ठेवीदारांमध्ये संताप; बँकेचे अध्यक्ष समोर आले, नेमकं काय म्हणाले?
अमोल भावले, महेश रोडे, मोहसीन पठाण हे बीडच्या कारागृहात विविध गुन्ह्यांत बंदी आहेत. येथील अधीक्षक आपल्यावर दबाव आणत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. तसेच महापुरुष, संत, महंतांचे फोटो काढून त्या ठिकाणी बायबलचे वाक्य लिहिले. धर्मांतर करणे हा कायद्याने गुन्हा असतानाही शासकीय अधिकारी असलेले अधीक्षक पेट्रस गायकवाड हेच याचे उल्लंघन करीत आहेत. Beed News Today Marathi
त्यांचे निलंबन करून कारवाई करावी, अशी मागणीही ॲड. आघाव यांनी केली आहे. गायकवाड यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांची बाजू समजली नाही.
ही बातमी वाचा :







