BMC Diwali Bonus: मुंबई महापालिकेची दिवाळी झाली ‘सुपर गोड’! कर्मचाऱ्यांसाठी तब्बल इतक्या हजार रुपयांचा बोनस जाहीर!

Date:

BMC Diwali Bonus News

BMC Diwali Bonus: आता दिवाळी जवळ आली की सर्व सरकारी आणि खाजगी नोकरदारांना बोनस मिळत आसतो. तर त्याच पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी खरंच खूप खास आणि गोड झाली आहे! महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी आज (१६ ऑक्टोबर २०२५) दीपावलीनिमित्त कर्मचाऱ्यांसाठी भरघोस बोनस जाहीर केला आहे.

या घोषणेमुळे महापालिकेच्या हजारो कर्मचाऱ्यांमध्ये मोठा आनंद आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे. तर चला पुढे पाहूया नेमक किती रुपये बोनस कर्मचाऱ्यांना मिळणार आहे पाहूया. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला बीड न्यूज व्हाटसप्प चॅनल जॉइन करा. BMC Diwali Bonus News

लेटेस्ट अपडेट साठी बीड न्यूज WhatsApp चॅनल जॉइन कराJoin Now

मुंबई महानगरपालिका दिवाळी बोनस 2025

BMC Diwali Bonus News

कोणाला किती बोनस मिळणार? महापालिका प्रशासनाने विविध श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केलेले बोनस खालीलप्रमाणे आहेत:

मुख्य बोनस (₹३१,०००) :

  • ₹३१,००० इतका घसघशीत बोनस खालील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे:
    • महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी.
    • महापालिका प्राथमिक शाळेतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी.
    • अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी.
    • माध्यमिक शाळेतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित/विनाअनुदानित).

ही बातमी वाचा : Rohit Pawar | रोहित पवार यांचा खळबळजनक आरोप: ‘मतचोरी’ झालीय, पुरावा म्हणून ट्रम्प यांचं आधारकार्ड दाखवलं!

याव्यतिरिक्त, महापालिकेच्या शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षण सेवकांना आणि अध्यापक विद्यालयातील कर्मचाऱ्या/अधिव्याख्यात्यांना देखील ₹३१,००० चा लाभ मिळेल. BMC Diwali Bonus News

इतरांना ‘भाऊबीज भेट’ :

काही विशिष्ट गटातील कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेने ‘भाऊबीज भेट’ म्हणून विशेष रक्कम जाहीर केली आहे:

  • सामाजिक आरोग्य स्वयंसेविका: ₹१४,००० (चौदा हजार रुपये)
  • बालवाडी शिक्षिका/मदतनीस: ₹५,००० (पाच हजार रुपये)

कर्मचारी म्हणाले, ‘ही दिवाळी खास’!

महापालिकेच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले आहे. सणासुदीच्या काळात खरेदीसाठी, घरगुती खर्चासाठी आणि दिवाळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी हा बोनस एक मोठा आर्थिक आधार देणारा आहे. कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्या या निर्णयाचे जोरदार स्वागत केले असून, “ही दिवाळी आमच्यासाठी खरंच खूप खास बनवणारा निर्णय आहे,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. BMC Diwali Bonus News

ही बातमी वाचा :

Bhagvat

मी भागवत! मला मीडिया व डिजीटल कंटेंट लेखनाचा 3 वर्षांचा अनुभव आहे. यांना लाईफस्टाईल, सौंदर्य, आरोग्यविषयक घरगुती उपाय यामध्ये विशेष रस आहे. मला, वाचकांच्या गरजा आणि आवड लक्षात घेऊन त्या सोप्या समजेल अशा मराठी भाषेत आणि संशोधन करून सोबतच जीवनशैलीत वापर करून लेख लिहिण्याची आवड आहे.