HSC Exam Form Fill up Date 2025: 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ, पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची अवस्था दाखवल्यावर सरकारचा निर्णय

Date:

HSC Exam Form Fill up Date 2025 Maharashtra

HSC Exam Form Fill up Date 2025: राज्यामध्ये चालू असणाऱ्या मुसळदार इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. पुढे सविस्तर बातमी दिली आहे ती वाचा. कारण जर तुमच्या घरामध्ये कोणी बारावीच्या वर्गामद्धे शिकत असेल तर ही माहिती कामाची ठरेल.

राज्यातील तसेच देशातील अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला बीड न्यूज चॅनल लगेच जॉइन करा.

Maharashtra Floods News Marathi

इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची व्यथा दाखवल्यावर सरकारला दाखवल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता राज्यातील विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी सवलत मिळणार आहे. HSC Exam Form Fill up Date 2025

लेटेस्ट अपडेट साठी बीड न्यूज WhatsApp चॅनल जॉइन कराJoin Now

ही बातमी वाचा : Narendra Modi On Ind vs Pak Asia Cup Final: भारताने पाकिस्तानला लोळवलं, फायनलनंतर दुबईत राडा; नरेंद्र मोदी म्हणाले, मैदानात..

महाराष्ट्र पाऊस बातम्या

HSC Exam Form Fill up Date 2025

राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी नद्यांना नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जवळपास 20 जिल्ह्यांत, त्यातही विशेषत: मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत पाऊस आणि महापुराने सर्वसामान्यांचे जगणे उद्ध्वस्त केले.

शेती, पिके, घरेदारे, गुरेढोरे सगळे काही वाहून गेले. अत्यंत निगुतीने उभा केलेला संसार एका पावसाने मोडून पडला. पावसाने काही तासांत होत्याचे नव्हते झाले. शाळकरी आणि महाविद्यालयीन पोरांची वह्या, पुस्तके, दफ्तरं सगळं वाहून गेलंय.

याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी 12 वी चे अर्ज भरायला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं 12 वी च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. HSC Exam Form Fill up Date 2025

ही बातमी वाचा : Asia Trophy News: टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानचा मोहसीन नक्वी हॉटेलमध्ये घेऊन पळाला; ट्रॉफी भारताला मिळणार?, बीसीसीआयने स्पष्ट केली भूमिका

12th Class Exam Exam Form Last Date

कोणत्याही विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी सूचना एकनाथ शिंदे यांनी दादा भुसे यांनी दिली आहे. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यथा मांडली होती. यानंतर सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळं 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.  

नेमकं काय म्हणाले मंत्री शिक्षणमंत्री दादा भुसे?

शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन येऊन गेला आहे. त्यानुसार 12 वी च्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढवली असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली आहे. शाळा इमारतीच्या नुकसान यावर लक्ष ठेऊन आहे. कार्यवाही करु. पुढच्या आठवड्यात राज्यभरातील अहवाल घेऊन निर्णय घेतला जाईल अशी माहिती दाद भुसे यांनी दिली आहे. HSC Exam Form Fill up Date 2025

ही बातमी वाचा :

Bhagvat

मी भागवत! मला मीडिया व डिजीटल कंटेंट लेखनाचा 3 वर्षांचा अनुभव आहे. यांना लाईफस्टाईल, सौंदर्य, आरोग्यविषयक घरगुती उपाय यामध्ये विशेष रस आहे. मला, वाचकांच्या गरजा आणि आवड लक्षात घेऊन त्या सोप्या समजेल अशा मराठी भाषेत आणि संशोधन करून सोबतच जीवनशैलीत वापर करून लेख लिहिण्याची आवड आहे.