Maharashtra Paus Batmya Today
Maharashtra Paus Batmya Today: राज्यामध्ये हाहाकार केल्यानंतर आता मात्र महाराष्ट्रावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होऊन हे क्षेत्र खंबातच्या आखाताच्या दिशेने पुढे सरकल्याने महाराष्ट्रातील पावसाची तीव्रता रविवारनंतर कमी झाली. सोमवारी मुंबई तसेच ठाणे, पालघर जिल्ह्यांना दिलेला ऑरेंज अलर्टही मागे घेण्यात आला आणि मुंबईकरांना पावसाच्या तडाख्यापासून दिलासा मिळाला.
तर पुढे तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता. आणि राज्यातील अशाच लेटेस्ट अपडेट यासाठी आपल्या बीड न्यूज व्हाटसप्प चॅनल ला जॉइन होऊ शकता.
Mumbai Paus Batmya Today

मंगळवारपासून किमान चार दिवस मुंबई तसेच पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे. त्यामुळे दसऱ्याचा दिवस पावसात जाणार नाही असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मुंबईत कुलाबा येथे रविवारी सकाळी ८.३० ते सोमवारी सकाळी ८.३० या कालावधीत १०१.२ मिलीमीटर तर सांताक्रूझ येथे ७७.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
सोमवारी दिवसभरात एखाद दुसरी सर मुंबईकरांनी अनुभवली. सोमवारी सकाळी ८.३० ते सायं. ५.३० पर्यंत कुलाबा येथे ०.२ मिलीमीटर तर सांताक्रूझ येथे ०.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. Maharashtra Paus Batmya Today
मुंबई पावसाची शक्यता
त्यामुळे मुंबईच्या कमाल तापमानात रविवारपेक्षा सुमारे तीन अंशांनी वाढ झाली. कुलाबा येथे रविवारी २५.४ तर सांताक्रूझ येथे २५.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. ते सोमवारी अनुक्रमे २८.४ आणि २८.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. मुंबईत २९ सप्टेंबरपर्यंत पडलेला पाऊस हा अनुक्रमे ७७ टक्के अतिरिक्त आहे.
ही बातमी वाचा : October Weather Update in Marathi: सप्टेंबर अतिवृष्टीत गेला, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा पाऊस झोडपणार, या ठिकाणी अलर्ट
Maharashtra Weather Forecast Marathi
प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत पालघर, ठाणे, मुंबई, रायगड येथे मध्यम पावसाची शक्यता आहे, तर रत्नागिरीमध्ये बुधवारपासून आणि सिंधुदुर्गात शुक्रवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत कोल्हापूर, सातारा घाट परिसरातही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे.
त्यानुसार मराठवाड्यामध्ये परभणी, बीड, नांदेड, हिंगोली, लातूर या जिल्ह्यांमध्ये या आठवड्यात पुन्हा एकदा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवारच्या पूर्वानुमानानुसार छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव येथे हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.
याबरोबरच विदर्भातही बुधवारपासून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. परतीच्या पावसाची रेषा वेरावळ, भरुच, उजैन, झाशी, शहाजहानपूर येथपर्यंत आली आहे. यामुळे आता पाऊस पुनः नुकसान करणार का? असा प्रश्न लोकांच्या मनात आहे. Maharashtra Paus Batmya Today
News Source : https://maharashtratimes.com
ही बातमी वाचा :







