Mumbai Rains Updates Marathi
Mumbai Paus News Today: राज्यामध्ये पावसाचा धुमाकूळ चालू असताना आज मुंबईसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, पालघर, रायगडसह संपूर्ण कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढे वाचा सविस्तर बातमी. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी जॉइन करा बीड न्यूज व्हाटसप्प चॅनल लगेच.
मुंबई आजचे हवामान
आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता (Heavy Rain In Maharashtra) वर्तवली जातेय. मुंबई सोबतच ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट (Mumbai Rain Updates) देण्यात आला आहे. तर नाशिक आणि पुणे घाट माथ्यावरही रेड अलर्ट (Nashik Pune Rain Updates) देण्यात आला आहे. Mumbai Paus News Today
Mumbai Paus News Today Marathi

मुंबईसह उपनगरात काल मध्यरात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरात रिप रिप पाऊस सुरू आहे. पहाटेपासून पश्चिम उपनगरात पावसाच्या जोर कमी असल्यामुळे सखल भागात पाणी भरलं नाही. सध्या पश्चिम (Western Railway), मध्य (Central Railway) आणि हार्बर लाईनवरील लोकल (Mumbai Local Updates) वाहतूकसह रस्ते वाहतूक देखील सुळरित सुरु आहे. Mumbai Paus News Today
ही बातमी पहा : Beed Paus Batmya: केज तालुक्यात पावसाचा हाहाकार; तब्बल ४४ गावांचा संपर्क तुटला, १४१ घरांची पडझड!
आपत्कालीन संपर्क क्रमांक- (Maharashtra Emergency Numbers)
खाली जे नंबर दिले आहेत त्यावर नागरिक काही अडचण उद्भवल्यास संपर्क करू शकतात.
- धाराशीव: 02472-227301
- बीड: 02442-299299
- परभणी: 02452-226400
- लातूर: 02382-220204
- रत्नागिरी: 7057222233
- सिंधुदुर्ग: 02362-228847
- पुणे: 9370960061
- सोलापूर: 0217-2731012
- अहमदनगर: 0241-2323844
- नांदेड: 02462-235077
- रायगड: 8275152363
- पालघर: 02525-297474
- ठाणे: 9372338827
- सातारा: 02162-232349
- मुंबई (शहर व उपनगर): 1916 / 022-69403344
Thane Paus News Today
तर ठाण्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. ठाण्यातील वंदना डेपो, माजीवाडा , तीन हात नाका या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पानी साचले आहे. यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे. आणि आज ठाणे जिल्ह्याला देखील रेड अलर्ट देण्यात आलाय. ठाणे जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क झालं आहे.
आणि लोकांना देखील सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच कामाव्यातीरिक्त घराबाहेर पडू नये असे आवाहन देखील करण्यात येत आहे.
Konkan Paus Batmya Today

रत्नागिरी, सिंधुदुर्गाला ऑरेंज, मराठवाडा, विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट- (Orange Alert For Konkan): रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर मराठवाडा, विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना देण्यात आल्यात.
मराठवाडा आणि इतर भागात देखील पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. गेले काही तासापासून सतत पाऊस चालू असल्यामुळे जन जीवन विस्कळीत झाले आहे. आणि गावांचा संपर्क तुटत आहेत.
ही बातमी पहा : Beed News: मोठी बातमी! बीडच्या स्थानिक पत्रकाराच्या मुलाची निर्घृणपणे हत्या; जागीच मृत्यू, वाचा सविस्तर
Important notices for citizens
नागरिकांसाठी महत्वाच्या सूचना : नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे, धोकादायक व पूरप्रवण भाग टाळावेत, वीज पडत असताना झाडाखाली थांबू नये, पूरस्थितीत नदी-नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत असताना रस्ता ओलांडू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्टपणे सांगितले आहे. आपत्तीच्या परिस्थितीत स्थानिक निवारा केंद्रांचा वापर करावा आणि अनावश्यक प्रवास व पर्यटन टाळावे.
Mumbai Paus News Today ही माहिती शेअर करा तुमच्या गावातील इतर मंडळींना आणि ताज्या अपडेट साठी भेट द्या बीड न्यूज ला.
ही बातमी पहा :







