Mumbai Water Logging Today: मुंबईसह उपनगरांत पावसाचा जोर, कुठे पाणी साचलं, तर कुठे झाडं कोसळली? रेल्वे सेवाही विस्कळीत!

Date:

Mumbai Water Logging Today in Marathi

Mumbai Water Logging Today: आज मुंबईत सकाळपासूनच पावसाची (Rain) संततधार सुरु आहे.  पूर्व आणि पश्चिम उपनगरातही (Eastern and Western Suburbs) पावसाचा जोर दिसून येतोय. कांदिवली, बोरिवली, दहिसर परिसरात पाऊस आहे. मुंबईत (Mumbai) आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. पहिल्याच पावसात मुंबईकरांची कोंडी झाल्याचं पाहिला मिळालं आहे. तसेच काही भागामध्ये रेड अलर्ट देण्यात अल आहे.

भांडूपच्या एल बी एस रोडवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाताना मोठी वाहतूक कोंडी(Traffic) झाली होती. पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलं होतं. मात्र आता ते ओसरलंय.. त्यामुळे या भागातील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येतेय.  अनेक सखल भागात पाणी साचायलं होतं. Mumbai Water Logging Today

Reminder : अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला चॅनल जॉइन करा

बीड न्यूज WhatsApp चॅनल जॉइन कराJoin Now

Mumbai Railway News Today In Marathi

Mumbai Water Logging Today

रेल्वे सेवेवर परिणाम: मुंबई मध्ये सकाळपासून कोसळणाऱ्या पावसाने रेल्वेच्या तीनही मार्गावर परिणाम झाला आहे. पावसाने सध्या विश्रांती घेतली असली तरी मध्य, पश्चिम आणि हाबर रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशीराने सुरु आहे. ठाणे रेल्वे स्थानकात रुळांवर पाणी साचलं, पाणी वाढल्यास पंपाद्वारे पाणी उपसा करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याचं रेल्वे व्यवस्थापनाने सांगितलं आहे.

तसेच विक्रोळी पश्चिममधल्या सूर्या नगर परिसरात संरक्षक भिंत कोसळलीय. डोंगरावर असलेल्या चाळ परिसरात ही घटना घडलीय. सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही. ही भिंत विभागातील नागरिकांसाठी बसण्यासाठी असणाऱ्या शेडवर पडलीय. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. परिसरात भीतीचे वातावरण आहे. Mumbai Water Logging Today

ही बातमी वाचा : Mumbai Paus News Today: मुंबईला आज रेड अलर्ट, पश्चिम उपनगरात पावसाला सुरुवात; लोकलची काय स्थिती?, पहा सगळी माहिती येथे

Navi Mumbai Rain Update in Marathi

नवी मुंबईत झाडं कोसळली : नवी मुंबईतल्या सीवूड्समध्ये एनआरआय कॉम्प्लेक्समध्ये गाड्यांवर भिंत कोसळल्याची घटना घडलीये. सकाळपासून पाऊस सुरु असल्याने इमारतीच्या भिंतीचा मोठा भाग गाड्यांवर कोसळला. यात तीनही गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये.

नवी मुंबई मनपा अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून भिंत बाजूला काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. नवी मुंबई मद्ये सकाळ पासून दुपारपर्यंत 60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दोन ठिकाणी झाडे पाडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

ठाणे शहरातील खोपट येथे रस्त्यावर वडाचं झाड कोसळलं. रस्त्यावरून कार जात असतानाच हे झाड कोसळलं. यात कारचं नुकसान झालं. मात्र कारचालक थोडक्यात बचावला. ठाणे शहरात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र या पावसामुळे ठाण्यासह कळव्यातल्या नालेसफाईची पोल खोल झालेली पाहायला मिळाली आहे. Mumbai Water Logging Today

ही बातमी वाचा : India Vs Pakistan Asia Cup Final: आशिया कपमध्ये कोण होणार प्लेअर ऑफ द टूर्नामेंट? टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्माला चौघांकडून तगडी फाईट!

अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळतंय. कळवा पूर्व परिसरात तलावाचं पाणी बाहेर येऊ लागलंय. तलावातले मासे आणि कासवही रस्त्यावर दिसून येतायत.. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर घरात पाणी शिरण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केलीय. कळव्यातील ज्येष्ठ नगरसेवक महेश साळवी यांनी ठाणे महापालिका प्रशासनावर टीकास्त्र सोडलंय.

नालेसफाईच्या नियोजनशुन्य कामामुळे यंदाही पहिल्याच पावसात कळवा जलमय झालंय. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याचा आरोप करत साळवींनी प्रशासनाच्या गलथान कारभाराला जबाबदार धरले आहे. Mumbai Water Logging Today

Kalyan Paus Update Today in Marathi

कल्याणमध्ये पावसाचा जोर : मुंबई प्रमाणेच कल्याण डोंबिवलीत पावसाचा जोर कायम आहे. कल्याण आडीवली ढोकळी परिसरात रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलंय त्याने लोकांचे हाल होत आहेत तसेच वाहन चालक आणि विद्यार्थ्यांचे हाल होतायत. काही इमारतींमध्येही पाणी शिरलं असून बैठ्या चाळीतली घरांमध्ये पाणी गेल्यानं रहिवासी हैराण झाले आहेत.

य़ामुळे मात्र महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झालीय.  भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात सकाळ पासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील तीनबत्ती,भाजी मार्केट,बाजारपेठ परिसरात रस्त्यावर 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचलं. इथल्या अनेक दुकानात पाणी शिरल्याची घटना घडली आहे.

पावसाने भिवंडी महानगरपालिकेने केलेल्या नालेसफाईची पोलखोल झाली असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. या सगळ्या दरम्यान मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी बीकेसीत जाऊन मिठी नदीची पाहणी केली. सखल भागात पाणी साचलेल्या ठिकाणांचा त्यांनी आढावा घेतला.

मुंबईत पावसाचा जोर कायम राहिल्यास मिठी नदीचं पाणी पात्राबाहेर येऊ शकतं. त्याच पार्श्वभूमीवर चहल यांनी मिठी नदी परिसराची पाहणी केली. नालेसफाईची कामं पूर्ण झालीयत, पाण्याचा तातडीनं निचरा होईल यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं चहल यांनी सांगितले आहे. Mumbai Water Logging Today

ही बातमी वाचा :

Bhagvat

मी भागवत! मला मीडिया व डिजीटल कंटेंट लेखनाचा 3 वर्षांचा अनुभव आहे. यांना लाईफस्टाईल, सौंदर्य, आरोग्यविषयक घरगुती उपाय यामध्ये विशेष रस आहे. मला, वाचकांच्या गरजा आणि आवड लक्षात घेऊन त्या सोप्या समजेल अशा मराठी भाषेत आणि संशोधन करून सोबतच जीवनशैलीत वापर करून लेख लिहिण्याची आवड आहे.