Rohit Pawar News Today Marathi
Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच एक स्फोटक पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी थेट ‘मतचोरी’ सारखे गंभीर आरोप केले असून, मतदारांच्या यादीत मोठा घोळ झाल्याचा दावा केला आहे.
नेमके प्रकरण काय आहे वाचा पुढे सविस्तर आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला बीड न्यूज व्हाटसप्प चॅनल लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच अपडेट मिळत राहतील.
डोनाल्ड ट्रम्प यांचे ‘आधारकार्ड’ कशासाठी?

आपल्या आरोपांना बळकटी देण्यासाठी रोहित पवार यांनी एक अनोखा पुरावा सादर केला. त्यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचं छापलेलं आधारकार्ड दाखवलं!
रोहित पवार यांचा मुद्दा असा होता की, जर अशा प्रकारे कोणाचंही आधारकार्ड (फेक) काढलं जाऊ शकतं, तर याच पद्धतीने अनेकांनी बनावट आधारकार्ड मिळवून, त्याचा वापर करून बोगस मतदार ओळखपत्रे तयार केली असतील आणि अनेकदा मतदान केलं असेल. म्हणजेच, मतदारांच्या ओळखपत्रात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे.
ही बातमी वाचा : Gondia New Palakmantri : गोंदियाच्या पालकमंत्रिपदी मोठी राजकीय उलथापालथ! बाबासाहेब पाटलांचा राजीनामा; इंद्रनील नाईक यांच्यावर नवी जबाबदारी
मतचोरीचे आकडे आणि थेट भाजपवर आरोप
रोहित पवारांनी अनेक मतदारसंघांचे आकडे जाहीर करत ‘मतचोरी’ कशी झाली हे समजावून सांगितले. Rohit Pawar
- त्यांनी पुणे जिल्ह्यातील शिरूर, वडगाव शेरी, खडकवासला, पर्वती आणि हडपसर यांसारख्या मतदारसंघांमध्ये सुमारे ५४,००० बोगस नावे वाढवण्यात आल्याचा आरोप केला.
- “आमचे कार्यकर्ते जेव्हा हे मतदार शोधायला गेले, तेव्हा त्यांना एकही व्यक्ती त्या ठिकाणी सापडला नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
- मतदान करण्याची पद्धत: काही ठिकाणी लोकांना बसमधून आणले गेले, त्यांच्याकडून मतदान करवून घेतले आणि पैसे देऊन पुन्हा त्यांना त्यांच्या मतदारसंघात पाठवले गेले, असा दावा त्यांनी केला. Rohit Pawar News Today Marathi
रोहित पवार यांनी या मतचोरीसाठी थेट भाजपवर निशाणा साधला. या सर्व गैरव्यवहारासाठी एक ‘मेथडॉलॉजी’ (पद्धत) तयार करण्यात आली आणि ती तयार करणारी व्यक्ती म्हणजे देवांग दवे नावाचे भाजपचे पदाधिकारी आहेत, असा त्यांचा आरोप आहे.
ही बातमी वाचा : Sanjay Raut Raj Thackeray: राऊतांचा राज ठाकरेंना मेसेज; संजय राऊतांमुळे मनसे नाराज, उलटसुलट चर्चांना उधाण येताच.. वाचा सविस्तर
सर्वात मोठा आरोप: निवडणूक आयोग (Election Commission) ही एक स्वायत्त संस्था असताना, देवांग दवे या व्यक्तीला आयोगाच्या वेबसाइट आणि इंटरनेटची जबाबदारी देण्यात आली. यामुळे भाजप पदाधिकाऱ्याकडे आम्हाला माहिती मिळण्याआधीच सर्व डेटा उपलब्ध होता, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवार यांच्या मुख्य मागण्या
या सर्व आरोपांनंतर, रोहित पवार यांनी निवडणूक आयोगाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत:
- माहिती द्या: अचानक वाढलेल्या मतदारांची सविस्तर माहिती लेखी स्वरूपात दिली जावी.
- डिजिटल याद्या: मतदारांच्या डिजिटल याद्या उपलब्ध करून देण्यात याव्यात.
- सीसीटीव्ही फुटेज: मतदानाच्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे, विशेषतः शेवटच्या तासाचे, कारण शेवटच्या तासात ६८ लाख लोकांनी मतदान केले, ते कोण होते हे बघायचे आहे.
- बीएलओ नोंदी: ‘बीएलओ’ (बूथ लेव्हल ऑफिसर) यांनी केलेल्या डायरी नोंदींची माहिती द्यावी. Rohit Pawar
रोहित पवारांनी पनवेल, कल्याण ग्रामीण, भोसरी, मीरा भाईंदर अशा अनेक मतदारसंघांमध्ये सहा महिन्यांच्या आत मोठ्या संख्येने मतदार वाढल्याचा दावा केला आहे. या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
ही बातमी वाचा :






