October Weather Update in Marathi: सप्टेंबर अतिवृष्टीत गेला, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा पाऊस झोडपणार, या ठिकाणी अलर्ट

Date:

October Weather Update in Marathi

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अतिवृष्टीने दाणादाण उडाली आहे. विशेष मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत. अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. गावात पाणी शिरल्यामुळे शेकडो नागरिकांना स्थलांतर करावे लागले. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र विदर्भातही पावसाने थैमान घातले होते. आता कुठे एक दोन दिवसापासून थोडी सुटमोकळ पावसाने दिली आहे.

आता येणाऱ्या पुढच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये नेमके पावसाची काय परिस्थिति असणार आहे. याच्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर चल सविस्तर माहिती पाहूया. आणि अहसच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प चॅनल लगेच जॉइन करा. October Weather Update in Marathi

लेटेस्ट अपडेट साठी बीड न्यूज WhatsApp चॅनल जॉइन कराJoin Now

ऑक्टोबर महिना पाऊस आहे का?

October Weather Update in Marathi

आता सध्या तरी महाराष्ट्रामद्धे बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर कमी झालेला आहे पण तरी पुढील चार दिवस विदर्भ मराठवाड्यासह तळ कोकणात काही जिल्ह्यांना पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत. (IMD Forecast)

बंगालच्या उपसागराच्या पश्चिम भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून पुढील चार दिवस महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट हवामान विभागाने दिले आहेत. 3 ऑक्टोबरपर्यंत  पावसाचे अंदाज  देण्यात आले असून पुन्हा विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. 

ही बातमी वाचा : Beed Batmya Marathi: गोदावरीला पूर, बीड जिल्ह्यात जीवन विस्कळीत, तांदूळ आणि कन्या खाण्याची वेळ, महिला संतप्त 

हवामान विभागाचा अंदाज काय?

हवामान विभागाचा ताज्या अंदाजानुसार,  पुढील सहा दिवस कोकण गोवा मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज (30 सप्टेंबर) रोजी नांदेड वगळता कुठल्याही जिल्ह्याला पावसाची शक्यता नाही.  पण उद्यापासून मराठवाडा विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. October Weather Update in Marathi

ही बातमी वाचा : Mumbai Paus News Today: मुंबईला आज रेड अलर्ट, पश्चिम उपनगरात पावसाला सुरुवात; लोकलची काय स्थिती?, पहा सगळी माहिती येथे

महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याला काय अलर्ट?

  • 30 सप्टेंबर- आज नांदेड वगळता राज्यात कुठेही पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय. नांदेड जिल्ह्याला येलो अलर्ट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
  • 1 ऑक्टोबर – रत्नागिरी व सातारा घाटमाथ्यावर पावसाचा यलो अलर्ट, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांनाही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. 
  • 2 ऑक्टोबर – मराठवाड्यातील हिंगोली परभणी नांदेड लातूर जिल्ह्यांना जोरदार पावसाची शक्‍यता असून उर्वरित मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा ,नागपूर, भंडारा ,गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. तसेच रत्नागिरी व सातारा घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट आहे.
  • 3 ऑक्टोबर- संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट, बीड परभणी हिंगोली नांदेड व लातूर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा, सिंधुदुर्ग रत्नागिरी तसेच कोल्हापूर व सातारा घाटमाथ्यावर पावसाचा यलो अलर्ट, बहुतांश राज्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. October Weather Update in Marathi

ही बातमी वाचा :

Bhagvat

मी भागवत! मला मीडिया व डिजीटल कंटेंट लेखनाचा 3 वर्षांचा अनुभव आहे. यांना लाईफस्टाईल, सौंदर्य, आरोग्यविषयक घरगुती उपाय यामध्ये विशेष रस आहे. मला, वाचकांच्या गरजा आणि आवड लक्षात घेऊन त्या सोप्या समजेल अशा मराठी भाषेत आणि संशोधन करून सोबतच जीवनशैलीत वापर करून लेख लिहिण्याची आवड आहे.