Samarth Cooperative Bank News: राज्यातील समर्थ सहकारी बँकेला RBI चा दणका, ठेवीदारांमध्ये संताप; बँकेचे अध्यक्ष समोर आले, नेमकं काय म्हणाले?

Date:

Solapur Samarth Cooperative Bank News Today

Solapur Samarth Cooperative Bank News: सध्या न्यूज आणि सोशल मीडिया वर तुम्ही विडियो बघितलेच असतील की काही लोक समर्थ सहकारी बँक मध्ये गोंधळ घालताना दिसत आहेत. नेमके प्रकरण काय आहे पुढे पहा. सोलापूरसह मुंबई, पुणे, सांगलीसह 32 शाखा आणि 1 लाखाहून अधिक ठेवीदार असलेल्या समर्थ सहकारी बँकेवर काल संध्याकाळपासून RBI (Reserve Bank of India) ने निर्बंध घातले आहेत. बँकेच्या विविध शाखांवर सकाळपासून ठेवीदारांची मोठी गर्दी आणि गोंधळ पाहायला मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना ठेवीदारांना घाबरण्याचे कारण नाही असे सांगितले. “मागील तीन महिन्यात बँकेने चांगली कामगिरी केली, तरीही बँकेवर झालेली कारवाई आश्चर्यकारक आहे. सर्वांचे पैसे सुरक्षित आहेत, निर्बंध हटताच बँक पैसे परत देऊ शकेल,” असे त्यांनी स्पष्ट केले. पुढे तुम्ही या सर्व प्रकरणाची माहिती पाहू शकता आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला बीड न्यूज व्हाटसप्प चॅनल जॉइन करा.

लेटेस्ट अपडेट साठी बीड न्यूज WhatsApp चॅनल जॉइन कराJoin Now

समर्थ सहकारी बँक नेमकं प्रकरण काय ?

प्रकरण असे आहे की सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर आरबीआयने पुढील सहा महिन्यांसाठी निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांमुळे आरबीआयच्या पूर्वपरवानगीशिवाय बँक कोणतंही नवीन कर्ज देऊ शकणार नाही, ठेवीस विचारू शकणार नाही किंवा कोणतेही मालमत्ता विक्री किंवा हस्तांतर करू शकणार नाहीये. बँकेची सध्याची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यास देखील आरबीआयकडून मनाई करण्यात आली आहे. Solapur Samarth Cooperative Bank News

ही बातमी वाचा : Mumbai Mahapalika Bharti 2025: बृहन्मुंबई महापालिकाच्या “या” विभाग मध्ये 1,12,000 रुपये पगाराची नोकरी!

मात्र ठेवीदारांना डीआयसीजीसी योजनेअंतर्गत त्यांच्या ठेवीवर पाच लाखांपर्यंत ठेव विमा मिळू शकतो असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. दरम्यान, आज सकाळपासून बँकेसमोर मोठी गर्दी जमली आहे. काही लोकांना लग्नासाठी पैसे काढायचे आहेत, तर काही लोकांना इतर कामासाठी पण आता ठेवीदारांना आपली ठेव काढून घ्यायची असल्याने बँकेसमोर घाईगडबड आणि तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. 

समर्थ सहकारी बँक वर आरबीआय ने निर्बंध कशामुळे घातले? बँकेचे अध्यक्ष म्हणाले…

या पार्श्वभूमीवर बँकेचे अध्यक्ष दिलीपअत्रे यांनी सांगितले की दरम्यान तांत्रिक बाबींची पूर्तता न झाल्याने काल संध्याकाळपासून RBI आमच्या बँकेवर निर्बंध घातलेत. गेल्या तीन महिन्यात बँकेने शेअर कॅपिटल दुप्पट केलेत, लिक्विडीटी देखील वाढलेली आहे बँकेचे गुंतवणूकदार बँकेच्या सोबत आहेत, 250 कोटी रुपये गुंतवायला ते तयार आहे. Solapur Samarth Cooperative Bank News

ही बातमी वाचा : Chhagan Bhujbal on Manoj Jarange: जरांगे मराठ्यांचा लीडर नाहीच, तो वाळू चोर… आपण उगाच जरांगेला डोक्यावर घेतो; भुजबळांनी जरांगेंना..

त्यामुळे बँकेवरील निर्बंध लवकरात लवकर हटवावं यासाठी आम्ही प्रयत्न करतोय झालेली कारवाई अंत्यत आश्चर्यकारक आहे, पण आमच्या हातात काही नाहीये. सॅलरी अकाउंट, मेडिकल इमरजन्सी किमान यासाठी ठराविक रक्कम काढण्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती आम्ही RBI कडे केलीय अशी माहिती देखील त्यांनी यावेळी बोलताना दिली. Solapur Samarth Cooperative Bank News

ही बातमी वाचा :

Bhagvat

मी भागवत! मला मीडिया व डिजीटल कंटेंट लेखनाचा 3 वर्षांचा अनुभव आहे. यांना लाईफस्टाईल, सौंदर्य, आरोग्यविषयक घरगुती उपाय यामध्ये विशेष रस आहे. मला, वाचकांच्या गरजा आणि आवड लक्षात घेऊन त्या सोप्या समजेल अशा मराठी भाषेत आणि संशोधन करून सोबतच जीवनशैलीत वापर करून लेख लिहिण्याची आवड आहे.