Uddhav Thackaray on Mahayuti

Uddhav Thackeray: राज्याच्या राजकारणात सध्या विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादंग सुरू असताना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला नियम आणि कायद्यावरून घेरले आहे. विधानसभा अध्यक्षांकडून विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीला होणाऱ्या विलंबावर ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
तर Uddhav Thackaray नेमके काय म्हणाले ते वाचा पुढे सविस्तर आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला बीड न्यूज चॅनल लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच अपडेट व्हाटसप्प वर मिळतील.
यावेळी, त्यांनी राज्यात असलेल्या दोन उपमुख्यमंत्र्यांच्या पदावर बोट ठेवत थेट सरकारला आव्हान दिले. “तुम्ही दोन-दोन असंवैधानिक पदे नेमत आहात. जर तुम्ही संख्याबळ आणि नियमांचे एवढे काटेकोरपणे पालन करत असाल, तर पहिले त्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा पदाचा दर्जा काढून टाका,” अशी जोरदार मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. Uddhav Thackaray on Mahayuti
उद्धव ठाकरे न्यूज
ठाकरे पुढे म्हणाले, “जर नियमानुसार एकच उपमुख्यमंत्री पद ठेवण्याचा किंवा ते पदच नसण्याचा नियम असेल, तर आज जे दोन उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी सामान्य मंत्र्यांप्रमाणे फिरावे. उपमुख्यमंत्री पदावर त्यांचा अधिकार नाही. या नियमांवरून सरकार दुटप्पी भूमिका घेत आहे.”
ही बातमी वाचा : Dharur News Marathi: शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान, कर्जमाफी द्या! ‘वंचित’चा आक्रोश मोर्चा धारूर तहसीलवर धडकला!
उद्धव ठाकरे यांनी आपल्या कठोर शब्दांत सरकारला सुनावले की, विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती तुम्ही नियमांमध्ये अडकवून ठेवली आहे, मात्र दोन उपमुख्यमंत्र्यांची पदे देताना तुम्हाला नियमांचे भान राहिले नाही. “याचा अर्थ तुम्ही सोयीनुसार नियम वापरता आणि सोयीनुसार पायदळी तुडवता,” अशी सडकून टीकाही त्यांनी केली.
त्यामुळे, राज्यातील दोन उपमुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पदांवरून आता उद्धव ठाकरे यांनी सरकारला कायद्याच्या चौकटीत उभे करून एक नवा वाद निर्माण केला आहे. Uddhav Thackaray on Mahayuti
ही बातमी वाचा :







